मोठी बातमी! राहुल गांधींना निवडणूक आयोगाचा झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नोटीस बजावण्यात आली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी, ते सामना पाहायला गेले आणि भारतीय संघ हरला. आपला संघ चांगली कामगिरी करत होता, पण पनौती तिकडे गेले आणि भारतीय संघाला हरवलं.

राहुल गांधींच्या याच वक्तव्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत कारवाई केली आहे. यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.राहुल गांधींच्या या टीकेला भाजपकडून देखील उत्तर देण्यात आलं होतं.

राहुल गांधी यांना 25 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांत या नोटीशीला उत्तर द्यावं लागणार आहे. यावर राहुल गांधी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान मोदी म्हणजे पनौती मोदी आहेत, भारतीय टीम चांगलं खेळत होती, पण हे पनौती तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवलं अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट्सने हरवलं. पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करूनसुद्धा अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेला सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते. त्यानंतर त्यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. मोदींमुळे हारलो असं त्यांचं म्हणणं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-