‘चिल्लर चाळे करू नका, तुम्हाला जड जाईल’; जरांगेंचा सरकारला इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नेवासा | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत आहे. आमरण उपोषण मागे घेतल्यापासून जरांगेंच्या राज्यभर सभा सुरु आहेत. कल्याण, ठाणे, सातारा, पुणे यानंतर जरांगे यांची आज नेवासा येथे सभा पार पडली.

सभेत बोलत असताना जरांगेंनी भुजबळांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांच्यावर नेम देखील धरला. येवला येथे बोलत असताना जरांगे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण म्हंटलं की विरोध चालू झाला. अनेकजण मराठा खेकड्यासारखा असल्याचे म्हणायचे, पण आता करोडो बांधव एकत्र आले आहे.

ही लाट आता थांबणार नाही. तो म्हातारा कसंही बरळत आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही, त्याची लायकी देखील नाही की आपण त्याचं नाव घ्यावं. सर्वांचं खातो आणि म्हणतो मी खात नाही, असा हल्लाबोल जरांगेंनी भुजबळांवर केला.

जरांगे पुढे म्हणाले की, येवल्यात आमचे बोर्ड फाडले असं कळलं, अजित दादाला सांगतो त्याला समजावून सांगा. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नाहीतर आमच्या नावाने खडे फोडू नका. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही सांगतो की, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आमचे बोर्ड फाडले असतील, तर मग आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल.

तुम्हाला हे जड जाईल आधीच सांगतो. चिल्लर चाळे करू नको म्हणून त्याला सांगत आहे. सरकारला देखील हे जड जाऊ शकते, गंभीर्याने घ्या, सरकारला त्रास होईल. येवल्यात मराठा बांधवांचे गावबंदीचे बोर्ड फाडल्यावरून जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

खळबळजनक! झोपमोड केल्यानं भाडेकरूने घरमालकासोबत केलं भयंकर कृत्य

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा