नाशिक | मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दौरा करत आहेत. कल्याण, ठाणे, सातारा, पुणेनंतर जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर गेले होते.
जरांगे यांच्या सभेला तरुणांपासून ते वृद्धापर्यंत लाखो लोकांनी गर्दी केली होती. नाशिक येेथे जरांगेंचं एकदम जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर जरांगेंनी सकाळी त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन आपल्या नाशिक दौऱ्याची सुरुवात केली. या सोबतच शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पाथर्डी फाटा या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने देखील जरांगेंचं स्वागत करण्यात आलं.
मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जरांगे पाटील पुढे रवाना होत शेणी येथे दाखल झालेत. यावेळी त्यांनी सभा घेतली असताना ते मराठा बांधवांवर चिडले.
काय आहे नेमकं प्रकरण ?
नेहमी सारखं नाशिक येथे देखील जरांगे यांच्या सभेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर काही मराठा तरूणांनी आरडा-ओरड केला. यानंतर मनोज जरांगे पाटील त्या तरूणांवरच भडकले.
खानदानी मराठ्यांची ही संस्कती नाही, असे जरांगे म्हणाले. तर मराठा समाज आरक्षणाच्या न्यायासाठी अनेक वर्षांपासून झुंज देतोय. मराठा समाजाला आरक्षण होतं. तरीही ते जाणून बुजून दिलं गेलं नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार
‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका
पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज
अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!