आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी बोलताना नार्वेकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नार्वेकरांचं मोठं वक्तव्य 

ज्या गतीने सुनावणी सुरू आहे त्यावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. माझ्याकडे सुनावणीसाठी फक्त 16 दिवस आहेत. त्यात या प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे. पण सुनावणी ज्या गतीने पार पडत आहे ते पाहता या प्रकरणाची सुनावणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणं अवघड आहे, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली. विधानसभा अध्यक्षांसमोर महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना व्हीपशी संबंधित घडामोडींवर प्रश्न विचारले.

जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही उत्तरावर जेठमलानी यांनी आक्षेपही घेतला. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि जेठमलानी यांच्यात खडाजंगी झाली.

जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांवरुन सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अशा प्रश्नांपासून संरक्षण मिळावं, अशी मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

नितेश राणेंना मोठा झटका, ‘या’ प्रकरणात कोर्टानं काढलं वॉरंट! 

नितेश राणेंच्या तोंडात घाणेरडी भाषा!, ठाकरेंवर बोलताना म्हणाले… 

‘तुमच्या पायाला हात लावून सांगतो की…’; जरांगेंचं मोठं वक्तव्य 

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका