‘तुमच्या पायाला हात लावून सांगतो की…’; जरांगेंचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नाशिक येथे आज सभा पार पडली. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहे. नाशिक येथील सभेला लाखो लोकांनी गर्दी केली होती.

दरम्यान बोलत असताना जरांगे पाटील यांनी अनेक मुद्दे काढले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भूजबळ यांच्यावर निशाणा धरला. बोलत असताना जरांंगे पाटलांनी मराठा आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन देखील केलं.

मराठा आंदोलकांना काय आवाहन केलं?

जरांगे पाटील यांच्या सभेला लोखो मराठा बांधव उपस्थित होते. या वेळी जरांगे पाटील यांनी त्यांना आवाहन केलं आणि म्हणाले की, “तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा मराठा समाजाची हानी होऊ देऊ नका.”

पुढे ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आला आहे. येथे 24 डिसेंबरच्या महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना 50% आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही.

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, मराठ्यांच्या ओबीसीत 32 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांचा गुणाकार केला, तर दीड ते पावणे दोन कोटी मराठा लोकांना लाभ होतोय. हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी दिलं असतं, तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात नंबर एकची प्रगत जात ठरली असती.

थोडक्यात बातम्या- 

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज 

अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ