जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं यासाठी जीवाची परवा न करता 35 उपोषणं केली. अजून तरी सरकारने कोणती सुद्धा ठोस भूमिका घेतली नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील सध्या राज्यभर सभा घेत आहेत.

कल्याण, सातारा, पुणे यानंतर जरांगेंची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सभा सुरु आहे. या सभेत बोलत असताना जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर त्यांनी मराठा ओबीसींच्या किती नोंदी सापडल्या याबाबत मोठा खुलासा केला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठ्यांच्या जवळपास 32 लाख ओबीसी नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत 85 टक्के लढा झाला. ताळमेळ हुकला नाही म्हणून इथवर आपण लढा जिंकलो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. एवढंच नाही तर जरांगेंनी सरकारला आव्हान देखील दिलं.

जरांगे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर आमच्यावर आणखी गुन्हे दाखल करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. मनोज जरांगे-पाटील हे आज ठाण्यात आहेत.

ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात त्यांची जाहीर सभा होतेय. या सभेला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जरांगे ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 25 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी मराठा बांधवांनी बाईक रॅलीही काढली.

थोडक्यात बातम्या – 

पुण्यात धडकी भरवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका! 

मोठा गौप्यस्फोट: ललित पाटील प्रकरणात ‘या’ बड्या नेत्यांची नावं 

मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवलं?, जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी घडला धक्कादायक प्रकार