मोठा गौप्यस्फोट: ललित पाटील प्रकरणात ‘या’ बड्या नेत्यांची नावं

पुणे | ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्याबाबात रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. ललितला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या वेळी ललितवर करण्यात आलेले आरोप त्याने फेटाळले. ललित सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणात कोणा कोणाचा हात आहे? याविषयी त्याची चौकशी सुरु आहे.

ललित प्रकरणात राजकीय नेते मंडळींचा हात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे ससून रुग्णालयाचे डीन यांनी ललितचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला मदत केली, असा आरोप डीनवर केला जात आहे. मात्र पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणाबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले रविंद्र धंगेकर?

पुण्यातील ससूनच्या डीनला मंत्री हसन मुश्रीफ आणि देवेंद्र फडणवीस हे पाठिशी घालतायत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलाय. तर ससूनचा कर्मचारी महेंद्र शेवते सगळे व्यवहार बघायचा मग त्याला अटक करा, अटक केल्यानंतर ललीत पाटील प्रकरणासंदर्भात सगळे समोर येईल, असा दावा रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

तर ललित पाटील प्रकरणातील कारवाईचा आढावा देखील रविंद्र धंगेकर यांनी घेतला. ललित पाटील याला अटक केल्यानंतर काही आरोपींसह दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

तर ससून रूग्णालयाच्या डीनवर शासनाकडून जी कारवाई करण्यात आली त्यावरून रूग्णालयाचे डीन पदमुक्त झालेत, अशी माहिती आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर दिली.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवलं?, जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी घडला धक्कादायक प्रकार

विश्वचषक सामन्याआधीच अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली…