विश्वचषक सामन्याआधीच अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली…

मुंबई | विश्वचषकाकडे आज अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा हा अंतिम सामना पहायला देशभरातून क्रिकेटप्रेमींनी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गर्दी केली आहे. राजकीय मंडळींसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील हजेरी लावणार आहेत.

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचा महामुकाबला आज होणार आहे. एकीकडे मैदानात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात कडवी झुंज रंगत असताना स्टेडियमवर अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाही भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहचणार आहे. या सामन्यासाठी अभिनेत्री खूपच उत्साहित आहे.

सामन्याआधी मीडियासोबत बोलताना अभिनेत्री म्हणाली,”भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला खात्री आहे की भारतच ट्रॉफी जिंकेल”.

थोडक्यात बातम्या- 

ऑस्ट्रेलियासमोर भारताला ‘या’ चूका पडू शकतात महागात

निवडणूक लढणार की नाही?; उद्यनराजे स्पष्टच बोलले 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतून मोठी बातमी समोर!

सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडर झाला स्वस्त

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या