निवडणूक लढणार की नाही?; उद्यनराजे स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सातारा | गेल्या महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाविषयी चर्चा चालू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर अनेक नेते मंडळींनी विनंती करत त्यांना उपोषण मागे घ्यायला लावलं.

उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळत नाही तोवर दौरा सुरु ठेवला आहे. जरांगे पाटील यांची सभा आज सातारा येथे पार पडली. त्यांच्या सभेला लाखो लोकांनी उपस्थिती लावली. यावेळी जरांगे पाटील यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेत आरक्षणाविषयी चर्चा केली.

उद्यनराजे भोसले आणि जरांगेंमध्ये काय चर्चा झाली?

आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची जरांगेंनी माहिती दिली. यावेळी उदयनराजे यांनीही त्यांना आंदोलन करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तुम्हाला कुटुंब आहे. त्यांना तुमची गरज आहे. त्यामुळे काळजी घ्या, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा देत जातिनिहाय जनगणना करण्याची मागणीही केली. माध्यमांशी बोलत असताना उद्यनराजे भोसले यांना ओबीसी समाज 150 मराठा आमदारांना पाडतील का?, असं प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर भाष्य करत उद्यनराजे भोसले म्हणाले की, मी म्हणतो पाडा. अजून काय बोलू? मीच उभा राहत नाही इलेक्शनला. पाडायचं काय बोलायचं? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला. अंतकरणातून विचार करा. काय बोलायचं? सर्वांनी मनापासून विचार करा. या देशाचे तुकडे करू नका. या देशाची वाट लावू नका. जातीजातीत भांडणं लावू नका; असं आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलं.

थोडक्यात बातम्या- 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतून मोठी बातमी समोर!

सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडर झाला स्वस्त

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या

मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता