पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या

मुंबई | गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईकरांना दुषित हवेचा सामना करावा लागत आहे. देशाची राजधानी दिल्लीला मुंबईने मागे टाकलं आहे. आता मुंबई देशातील सगळ्यात प्रदुषित शहर झालं आहे.

मुंबईप्रमाणे पुण्याची हवा खराब झाली. दिवाळीनंतर पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा होती. परंतु पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या 200 च्या वर गेला आहे.

मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 174 वर पोहोचला आहे. चेंबूर, बांद्रा, बोरीवली, मालाड आणि कुलाबा या भागाचा समावेश सगळ्यात प्रदुषित ठिकाणांमध्ये आहे.

पुण्याची हवा खराब वर्गवारीत आहे. यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुणे शहरात खोकला, श्वसन विकार आणि दम्याचे रुग्ण वाढले आहे.

स्वच्छ हवा, चांगलं वातावरण, राहण्यासाठी उत्तम शहर असलेल्या पुणे शहराची ही ओळख बदलू लागली आहे. आता पुणे प्रदूषित शहर झालं आहे. दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता चांगली होईल ही अपेक्षा होती. परंतु दिवाळीनंतर पुणे आणि मुंबईतील हवा खराबच आहे.

अशी घ्या काळजी

घराबाहेर पडताना मास्क वापरा

वयोवृद्ध लोकांनी घराबाहेर पडणं टाळावं

दमा, श्वसनविकाराची औषधे बंद करु नका

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!

‘महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय?’, भुजबळ मराठ्यांवर संतापले