राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या काही दिवसांंपासून राज्यातील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. ऐन दिवाळीमध्ये सुद्धा काही भागात पाऊस पडला होता. याचं कारण हवामान विभागाने सांगितलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आता अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा विरल्याने पावसाची रिमझिम कमी झाली आहे. असं असलं तरी राज्यासह देशात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, असा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. या सोबतच येत्या काही दिवसात राज्यातील काही भागात पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या कोणत्या भागात पाऊस पडणार?

भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तर त्यानंतर पुढील आठवड्यापासून थंडीचा जोर वाढणार आहे. तर दुसरीकडे आयएमडीच्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू, केरळमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागात हवामान ढगाळ राहणार आहे आणि त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसह कोकणात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.

तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जर येत्या दोन दिवसात दक्षिणेतील केरळ, तामिळनाडूमध्ये पाऊस झाला आहे तर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट पाहायला मिळणार असून हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज आहे.

थोडक्यात बातम्या- 

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!

‘महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय?’, भुजबळ मराठ्यांवर संतापले 

‘तुझं खातोय का रे…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

शरद पवारांचा मोठा दावा, ‘या’ बड्या नेत्याचं टेंशन वाढलं