अण्णा हजारे आक्रमक; घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई |आपल्या आंदोलनामुळे राज्याला नव्हे तर केंद्र सरकारला हादरुन सोडणारे अण्णा हजार पुन्हा सक्रीय झाले आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी आंदोलन पुकारलं आहे.

अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे आंदोलन करणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, देशातील सैनिकांचे भविष्य अधांतरी असू नये, यासह सैनिकांच्या मुलांना शिक्षण मोफत देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील माजी सैनिक सरकार विरोधात आंदोलन करणार आहे.

या आंदोलनाचं नेतृत्व अण्णा हजारे करणार आहे. या आंदोलनामुळे देशभरातील सैनिक सरकार विरोधात राळेगणसिद्धीत एकटवणार आहे. त्यांना अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहे.

अण्णांच्या आंदोलनानंतर सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. अण्णा हजारे यांचे लोकपालसाठी झालेले आंदोलन लक्षवेधी ठरले होते. या आंदोलनामुळे सर्व देशाचं लक्ष अण्णा हजारे यांच्याकडे लागले होते.

अण्णा हजारे यांनी 116 दिवसापेक्षा जास्त दिवस उपोषण केलं आहे. अण्णा यांच्या आंदोलनामुळे राज्यातील 450 अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!

‘महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय?’, भुजबळ मराठ्यांवर संतापले 

‘तुझं खातोय का रे…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल