मोठी बातमी! पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासलं

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पु्ण्यात प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांना काळं फासलं आहे. संबंधित प्रकार पुण्याच्या पत्रकार भवन येथे काळं फासण्यात आलं आहे.

शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुण्यात काळं फासलं आहे.

नेमकं काय घडलं?

नामदेव जाधव यांचा आज भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. पण भंडारकर इन्स्टिट्यूटने ती परवानगी नाकारली. कायदा आणि सु्व्यवस्थेचं कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.

नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनसमोर जमले. नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळं फासलं.

आमच्याविरोधात कारवाई व्हायची ती होऊद्या. पण माझं म्हणणं आहे, शरद पवार यांच्याविषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. ते कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे, नाही तेव्हा शरद पवारांचे पाया पडायला यायचा. शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्याने दिली.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतून मोठी बातमी समोर! 

सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडर झाला स्वस्त

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या

मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता