सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडर झाला स्वस्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मु्ंबई | सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दर कपात झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नवे दर आज जारी केले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी आज गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांहून अधिक कपात केली आहे.

गॅस सिलेंडर किती रुपयांनी कमी झाला?

दरम्यान, एलपीजी गॅल सिलेंडरची किमत 78 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Gas Cylinders Price Hike) किंमतीत कपात करण्यात आली आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसात सामान्यांना महागाईचा फटका बसला होता. मात्र, त्यानंतर तेल कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे सामन्यजनतेला दिलासा मिळाला आहे. सवस्त झालेल्या गॅसची किमत 78 रुपयांनी कमी झाली आहे. याआधी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 209 रुपयांनी वाढले होते.

तेल वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किमती जाहिर करतात. पण 10 वेळा महिन्याच्या मधेही सिलेंडरच्या दरात बदल करण्यात येते. आजही सिलेंडरचे दर कमी झाले आहेत.

इंडियन ऑइल (IOCL) च्या वेबसाइटनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1833.00 रुपये होती, ही किंमत 1755.50 रुपयांवर आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या

मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!