ICC World Cup 2023 | फायनलआधी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदाबाद | ICC World Cup 2023 अहमदाबादमध्ये होणाऱ्या मेगाफायनलपूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत विविध विषयावर भाष्य केलं आहे. विश्वचषकाची मागील दोन वर्षांपासून तयारी करत असल्याचंही रोहितने सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ प्रभावी कामगिरी करतोय, त्याची आम्हाला काहीच अडचण नाही. त्यांनी मागील आठ सामने जिंकले. फायनलचा सामना रंगतदार होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहे, असं रोहित म्हणाला.

विश्वचषकाची फायनल खेळणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. 50 षटकांचा विश्वचषकात पाहतच मी लहानाचा मोठा झालोय, असंही रोहित म्हणाला.

सर्व 15 खेळाडूंकडे खेळण्याची संधी आहे. आज आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर 12-13 खेळाडू निवडले जातील. पण प्लेईंग 11 अद्याप तयार नाही. सर्व 15 खेळाडू सामन्यासाठी तयार असावेत, असं रोहितने सांगितलं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या खेळपट्टीवर गवत नव्हते. पण फायनलसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर थोड्याफार प्रमाणात गवत आहे. मी अद्याप खेळपट्टी पाहिलेली नाही. पण खेळपट्टी संथ असण्याची शक्यता आहे. उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर सर्व निर्णय घेतला जाईल. खेळाडूंना याबाबत कल्पना आहे, असं रोहितने म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

निवडणूक लढणार की नाही?; उद्यनराजे स्पष्टच बोलले 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतून मोठी बातमी समोर!

सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडर झाला स्वस्त

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या

मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद