ऑस्ट्रेलियासमोर भारताला ‘या’ चूका पडू शकतात महागात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदाबाद | IND vs AUS Final अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे.  भारतीय संघाला विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. एक चूक घडली ती महागात पडू शकते.

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, इशांत किशन आणि श्रेयस अय्यर खातं न खोलता बाद झाले होते.

विराट कोहली आणि केएल राहुलने त्यानंतर डाव सावरला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत हाच कित्ता गिरवला गेला तर सर्वच भार मधल्या फळीच्या फलंदाजांवर येईल. पण त्यात अपयश मिळालं तर सहाव्या क्रमांकावर भरवश्याचं खेळाडू नसल्याचं स्पष्ट आहे.

भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. उपांत्य फेरीत विल्यमसन आणि मिचेलने 181 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं होतं. हार्दिक पांड्यामुळे सहावा गोलंदाज शॉर्ट पडत आहे. त्यामुळे पाच गोलंदाजांना जबाबदारीने आपली भूमिका बजवावी लागेल.

दरम्यान, क्रिकेटप्रेमींमधला उत्साह मिनिटा- मिनिटाला वाढतोय. अशात जिथं आजचा हा फायनलचा थरार रंगणार आहे. त्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केलीये.

प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची धडधड आता वाढत चालली आहे. कारण भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना सुरु व्हायला केवळ काही मिनिटं उरली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

निवडणूक लढणार की नाही?; उद्यनराजे स्पष्टच बोलले 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतून मोठी बातमी समोर!

सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडर झाला स्वस्त

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या