भंडारा | सर्वसामान्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी शासन आपल्या दारी ही योजना सुुरु केली आहे. दरम्यान आज भंडारा येथे या योजनेचा कार्यक्रम पार पडला.
भंडारा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्यामुळे डाॅक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्यास सांगितलं होतं.
त्यामुळे अजित पवार आजारातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आज जाहीर कार्यक्रमात भाषण केलं. अजित पवार या कार्यक्रमात काय बोलणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. मात्र पवार यांचं भाषण सुरु असतानाच अचानक गोंधळ उडाला.
नेमका काय आहे प्रकार?
अजित पवार यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. पण त्यांचं भाषण सुरु असताना एक अनपेक्षित प्रकार बघायला मिळाला. अजित पवार यांचं भाषण सुरु असताना अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
या तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या तरुणांना तातडीने ताब्यात घेतलं. पण तरीही काही काळासाठी गर्दीमधील वातावरण तणावाचं बघायला मिळालं.
थोडक्यात बातम्या –