मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवलं?, जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण जरी मागे घेतलं असलं, तरी जोवर आरक्षण मिळत नाही तोवर जरांगे पाटील महाराष्ट्रात दौरा करणार आहेत, असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे. सातारा, कल्याणनंतर जरांगे पाटील यांची पुणे येथे आज सभा पार पडली.

मराठा आरक्षणाविषयी जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथे जाहीर सभा घेतली. त्यांच्या सभेला लाखो लोकांनी उपस्थिती लावली. सभेत बोलत असताना त्यांनी सरकारवर टीका सुद्धा केली. या शिवाय त्यांनी सरकारला एक सवाल देखील केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं आहे. मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत आहे. यापूर्वी मराठा समाजासाठी नितीन करीर समिती गठीत झाली होती. परंतु त्या समितीच्या अध्यक्षांनाच माहीत नव्हते की आपण अध्यक्ष आहोत.

आता आमच्या कुणबी नोंदी सापडत आहे. 29 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. मग आतापर्यंत मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवलं आहे?, मराठा समाजातील आरक्षणात कोण आहे झारीतील शुक्राचार्य?, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

मराठा समाजाने नेहमी सर्वांना मदत केली. कधी जातीवाद केला नाही. अडचणीच्या काळात मराठा समाजाने सर्वांना मदत केली. गेल्या 75 वर्षांत जे जे पक्ष झाले, त्या पक्षातील सर्व नेत्यांना मोठं करण्याचे काम मराठा समाजाने केलं. त्या नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं, कारण त्यांना ते नेते आपले वाटले, असं जरांगे पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी घडला धक्कादायक प्रकार

विश्वचषक सामन्याआधीच अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली…