नितेश राणेंच्या तोंडात घाणेरडी भाषा!, ठाकरेंवर बोलताना म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे अनेकदा विरोधकांवर टीका करताना पाहायला मिळतात. अत्यंत बोचऱ्या शब्दात नितेश राणे विरोधकांवर टीका करत असतात. सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणेंनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरल्याचं दिसतंय. टीका करताना राणे हे आपण आमदार असल्याचं विसरलेत का असा प्रश्न सर्वांना पडलाय.

ठाकरेंवर टीका करताना राणेंची जीभ घसरली

नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठल्याचं दिसतंय. त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुल्ला असा करत त्यांच्यावर टीका केली आहे.

मातोश्रीची नवीन मम्मी 10 जनपथ वर असेल तर हा राहुल गांधीची बाजू घेणारच. भाजप सोबत ज्या शिवसेनेची युती होती, तो बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता. आता उद्धव ठाकरे मुल्ला झालेला आहे, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

फिल्म फेस्टिवल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठका ह्याच काय साम्य आहे. सिंधुदुर्ग तो बहाना है. पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के Actors के साथ नाचना है, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

सकाळी 90 मारल्याचा इफेक्ट आहे. भाजपमध्ये आल्यावर कोणाची प्रॉपर्टी मोकळी झाली ते सांगावं. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार, असं नितेश राणे म्हणाले. तसेच ज्या डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या, त्यावर कारवाई करण्याची मागणी मी गृहमंत्रालयाला करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आज सकाळी 10 जनपथचा नवीन कामगार, ज्याचा पगार राहुल गांधींकडून येतोय, तो नॅशनल हेराल्डची बाजू मांडताना दिसला. नॅशनल हेराल्ड काँग्रेसचे काम करते, तेच काम आता सामना करत आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुमच्या पायाला हात लावून सांगतो की…’; जरांगेंचं मोठं वक्तव्य 

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज 

अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!