पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. त्यानंतर आता पुण्यात एक नवा आजार आला आहे.

पुण्यात सध्या झिका आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे परिसरात आणखी सहा संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले आहेत.

झिकाचा रुग्ण कुठे आढळला?

पुण्यातील झिकाचा पहिला रुग्ण येरवडा येथे सापडला आहे. या रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पुणे महापालिकेने या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

आता याच भागात सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना तापाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलीये.

झिकाचा पुण्यातील पहिला रुग्ण 64 वर्षांची महिला होती. काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्याला या महिलेने हजेरी लावली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज 

अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात धडकी भरवणारा अपघात, पाहा व्हिडीओ