नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने केली ‘ही’ मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नॅशनल हेराल्ड (National Herald Case) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने 752 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांच्या यादीत दिल्लीतील नॅशनल हेराल्ड हाऊस, लखनऊमधील नेहरू भवन आणि मुंबईतील नॅशनल हेराल्ड हाऊसचा समावेश आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने यंग इंडियन, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपनीची 90 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने पीएमएलए, 2002 अंतर्गत चौकशी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 751.9 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या अटॅचमेंटचा आदेश जारी केला आहे, असे ईडीने ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ईडीच्या या कारवाईवर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंधवी म्हणाले की, ईडीने एजेएल मालमत्ता जप्त केल्याच्या बातम्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांतील निश्चित पराभवावरून लक्ष वळवण्याची त्यांची हताशता दर्शवते.

केंद्रावर राजकीय सूडबुद्धीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेसने नेहमीच केला आहे. मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही पुरावा नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे वृत्तपत्र चालवणार्‍या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणामध्ये फसवणूक, कट रचणे आणि विश्वासघाताचा गुन्हेगारी आरोपांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार 

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज 

अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ