पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | नोव्हेंबर महिन्यामध्ये हिवाळा सुरु होत असतो. मात्र आणखी सुद्धा राज्याच्या काही भागता हिवाळ्याचे काही चिन्ह दिसून येत नाहीये. या मागचं कारण म्हणजे राज्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे देशासह राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत राज्याच्या हवामानात मोठा बदल होऊन अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वातावरणात दोन दिवसबदल होण्याची शक्यता आहे.  याच बरोबर एक महत्त्वाची माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्याने कोणती महत्त्वाची माहिती दिली?

येत्या 23 आणि 24 नोव्हेंबरला राज्यात कोरडं आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तर त्यानंतर वातावरणावर परिणाम होऊन पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर राज्यात काही ठिकाणी आज तुरळक ठिकाणी पावसाची हलकी रिमझिम होऊ शकते.

24 नोव्हेंबर रोजी कोकण, गोवा किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने हवामानात बदल झाला आहे. यामुळे देशासह अंदमान-निकोबार बेट आणि लक्षद्वीपमध्येही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात धडकी भरवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका! 

मोठा गौप्यस्फोट: ललित पाटील प्रकरणात ‘या’ बड्या नेत्यांची नावं