शरद पवारांना मोठा धक्का!, ‘हा’ बडा नेता जाणार अजित पवार गटात?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गेले काही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम किंवा राजकीय बैठकांना उपस्थित नव्हते. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता अजित पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून ते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत.

आज अजित पवार आणि राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते आणि खासदार डाॅ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांची भेट झाली. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या भेटीमागे काय कारण आहे?, याचे तर्कविर्तक देखील लावले जात आहेत.

अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात काय बोलणं झालं?

माध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची अँटीचेंबरमध्ये भेट झाल्याची माहिती आहे.

अजितदादांसोबत झालेली भेट मतदारसंघातील विकासकामांबाबत होती, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः सांगितलं आहे. नुकतंच अजित पवार गटाकडून लोकसभेतील खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आलं आहे. यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

अमोल कोल्हे यांनी आधीच अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे, असा दावा अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी केला होता. दुसरीकडे, आपण शरद पवार गटासोबत असल्याचा दावा स्वत: अमोल कोल्हेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

84 पैशांच्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

खळबळजनक! झोपमोड केल्यानं भाडेकरूने घरमालकासोबत केलं भयंकर कृत्य 

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?