खळबळजनक! झोपमोड केल्यानं भाडेकरूने घरमालकासोबत केलं भयंकर कृत्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. मध्यंतरी पुण्यात कोयता गॅंगची दहशत होती. त्यानंतर पुण्यात गुुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. ज्यामुळे अनेक जणांच्या भूव्या उंचावल्या. झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केली आहे. भाडेकरूने मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली आहे. संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे.

माध्यमांच्या माहितीनूसार, धोत्रे हा ज्ञानदेव घुले यांचा भाडकेरु होता. धोत्रे हा घुले यांच्या चाळीत राहत होता. दरम्यान सोमवारी दुपारच्या वेळेस धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने घुले यांना मारहाण केली.

धोत्रे ने त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून खून केला. घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली. चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

थोडक्यात बातम्या- 

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार