शिंदे सरकार कोसळणार?; ‘या’ बड्या नेत्याने सांगितली तारिख

मुंबई | 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार आहे. 2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार आहे, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडीत खळा बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

31 तारखेपर्यंतच खोके सरकार टिकणार आहे, हे मला महापालिकेला सांगायचं आहे. मी बाहेर पडण्याची पालिका वाट बघत होते तर आधीच सांगायचं होतं. मी आधीच कोकणात दौरा करायला आलो असतो. यांनी डिलाईल रोडचं डिले रोड केलं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी महापालिकेवर टीका केली.

पदवीधर निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरची तयारी करत आहोत. लढत आहोत. महाविकास आघाडीचा विजय पक्का आहे. लोकसभा आणि विधानसभेत आमचाच विजय होईल. पण इतर निवडणुकीतही जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जोर लावत आहोत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या आजपासून कोकणात खळा बैठका होत आहेत. आदित्य ठाकरे अंगणात बसून पदाधिकारी, ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.

दोन दिवसांचा कोकण दौरा असणार आहे. या निमित्ताने पदवीधर निवडणुकीचाही आदित्य ठाकरे आढावा घेत आहेत. उद्या शुक्रवारी दुपारी दीड वाजता कुडाळ बांबार्डे येथे स्नेहा दळवी यांच्या घराच्या खळ्यामध्ये आदित्य ठाकरे हे सर्वांशी संवाद साधणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

बॉयफ्रेंड दुसऱ्या पोरीसोबत दिसला अन् पुढे नको ते घडलं, धक्कादायक प्रकार समोर 

Sex Life | पुरूषांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ 6 गोष्टी बनवू शकतात तुम्हाला नपुंसक 

‘जे रामाचे भक्त असतात ते…’; बागेश्वर महाराजांकडून फडणवीसांचं कौतुक 

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .