‘जे रामाचे भक्त असतात ते…’; बागेश्वर महाराजांकडून फडणवीसांचं कौतुक

पुणे | पुण्यातील संगमवाडी येथे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सलग तीन दिवस बागेश्वर महाराज पुण्यात होते. बागेश्वर महाराजांना भेटायला भक्तांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या ‘हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रमाचे येथे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

बागेश्वर महाराजांनी काय कौतुक केलं?

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक केलेलं नाही. ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलतो आहे. जे रामाचे भक्त असतात ते सगळ्यांचे असतात. जे रामाचे भक्त नसतात ते कुणाचेच नसतात, असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबा सनातन धर्मासाठी उत्तम काम करत असल्याचं म्हटलं आहे. सनातन धर्म रुढीवादी, जातीयवादी असल्याचा अपप्रचार काही लोक करतात. सनातन म्हणजे अनादी आणि अनंत…

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे. तिथे उच्च नीच असा भेदभाव नाही. सर्व ईश्वरांची मुले आहेत. हा भारताचा विचार आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या – 

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार