‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभर दौरा चालू आहे. 35 उपोषणानंतर जरांगे पाटलांनी राज्यात दौरा सुरु केला आहे. कल्याण, ठाणे, सातारा, नाशिक, पुणे या ठिकाणी जरांगेंनी जाहीर सभा घेतली. त्यांच्या सभेला लाखो लोक उपस्थित असतात.

मनोज जरांगे पाटील यांनी पार पडलेल्या सभेत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. या वेळी देखील एका सभेत बोलत असताना जरांगेंनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

आधी तुमच्या माणसाने आम्हाला बोलायची गरज नव्हती. 10-15 दिवस बोललो नव्हतो. तुमच्या माणसाने जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केलीत. सगळं वातावरण विनाकारण दूषित करुन ठेवलं. आम्ही बोललो की, तुम्हाला का वाईट वाटतं? तुमचा माणूस बोलला तेव्हा वाईट नाही वाटलं का? त्यांच्या माणसाने दुरुस्ती केली, गप्प बसला, तर आम्ही आमच्यात बदल करु.

1 तारखेपर्यंत त्यांचा माणूस गप्प बसतो का पाहू? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला. ते अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये बोलत होते.

23 तारखेपर्यंत टाईम बाँड दिला नाही, तर एक तारखेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.रात्री फोन आला होता, टाईम बाँड आणि गुन्ह्यासंदर्भात चर्चा झाली आहे आणि त्यावर बच्चू कडू यांनी स्टेटमेंट दिलं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका