काळीज पिळवटून टाकणारा अपघात; एका चुकीमुळे कुटुंब झालं उद्ध्वस्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

कोल्हापूर| कोल्हापूर येथून अंबाबाईचे दर्शन घेऊन घरी परतत असताना एका मिनी बसचा अपघात झाला आहे. कोल्हापूरवरुन गोव्याला जात असताना हा अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचं माध्यमांच्या माहितीनूसार समोर आलं आहे.

कोल्हापूर येथून अंबाबाईचं दर्शन घेत गोव्याला जात असताना देवकांडगाव येथे गारगोटी-आजरा रस्त्यावर मिनी बसला अपघात झाला. या आपघातात एकूण 21 जण होते तर, एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

नेमका कसा झाला आपघात?

आजर येथील धोकादायक वळणावरील चालकाला उताराचा अंदाज न आल्याने बस उलटली. सर्व प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. यामध्ये 15 जण किरकोळ जखमी झाले.

गोव्याला जाणारा जवळचा मार्ग म्हणून त्यांनी गारगोटीमार्गे जाणे पसंत केले. गाडी वेगात होती. देवकांडगाव जवळील घाटात चालकाला धोकादायक वळण व उताराचा अंदाज आला नाही.

चालकाने एकदम ब्रेक दाबल्याने गाडी उलटून पन्नास फुट फरफटत गेली. गाडीतील सिद्धी शिवाजी ढमके हिच्या दोन्ही हातांना मार लागला असून तिची प्रकृती गंभीर आहे. पल्लवी प्रकाश अधिकारी आणि विहान योगेश चन्ने यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. श्रेयश ज्ञानेश्वर मगर, प्रकाश अधिकारी व नितीश मलपेकर यांच्यासह 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट! 

‘या’ भागात अवकाळी पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा 

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार