पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील बंड केलं त्यानंतर राज्यात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र या सगळ्या गोष्टी विसरल्या तरी पहाटेचा शपथविधी कायम सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे.

23 नोव्हेंबर 2019 याच दिवशी पहाटेचा शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यामुळे अनेकजणांच्या भूवया उंचावल्या होत्या. भाजप आणि शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटण्यावरुन झालेला वाद विकोपाला जाऊन शिवसेनेने भाजपऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह जाण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत चर्चा सुरु होत्या. अशात 22 नोव्हेंबर 2019 च्या संध्याकाळी दरम्यान शपथविधीवर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक गौप्यस्फोट केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी बंड वगैरे केलं नव्हतं. ज्या काही गोष्टी पहाटेच्या शपथविधीच्या वेळी झाल्या त्या सगळ्या शरद पवारांसह ठरल्या होत्या. त्यांना या सगळ्याची पूर्ण कल्पना होती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांनी विश्वासघात केला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. उद्धव ठाकरे हे आमच्यासह निवडणूक लढले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की आपण काँग्रेस राष्ट्रवादीसह गेलो तर मुख्यमंत्री होऊ शकतो तेव्हा ते त्यांच्यासह गेले. त्यामुळे सर्वात मोठा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी आमच्याशी केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ भागात अवकाळी पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा 

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका