‘या’ भागात अवकाळी पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | नोव्हेंबर महिन्यात हिवाळ्याची चाहूल लागत असते. मात्र, यंदा राज्याच्या काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस राज्यातील काही भागात पावसाच्या बारीक सरी तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे.

दरम्यान, हिवाळ्यात राज्यात पाऊस येणार आहे. पुणे हवामान विभागाने 25 ते 27 नोव्हेंबर या वेळात राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हा पाऊस मुसळधार असणार आहे. याबरोबर हा पाऊस का पडणार याचं कारण देखील हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

हवामान खात्याने नेमकं काय कारण सांगितलं?

हिवाळी मोसमी वारा व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे पाऊस पडणार आहे. सध्या या परिस्थितीमुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस सुरु आहे. ही प्रणाली राज्याच्या पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करुन महाराष्ट्रात येत आहे.

यामुळे येत्या 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात गुरुवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे.

मुंबईसह सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, धारशिव, लातूर, नांदेड, यवतामाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. पावसाचं वातावरण 26 नोव्हेंबरला अधिक गडद होणार आहे. मध्य महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज