काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, शाळेची रिक्षा ट्रकला धडकली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

विशाखापट्टणम | आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये भीषण अपघात झाला आहे. येथे शाळकरी मुलांनी भरलेला ऑटो एका लॉरीला धडकला. ही धडक एवढी भीषण होती की ऑटोमधील सर्व मुले रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली.

आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून ऑटोमध्ये अडकलेल्या काही मुलांना बाहेर काढलं. ऑटो पूर्णपणे पलटी झाला यावरून या धडकेचा अंदाज लावता येतो.

शहरातील संगम सरथ थिएटर चौकाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला एका ट्रकने धडक दिली. बुधवारी सकाळी रेल्वे स्टेशनवरून सिरीपुरमच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ऑटो आणि लॉरी यांच्यात भीषण टक्कर झाली. ऑटोमध्ये प्रवास करणारे सात विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक लोकांनी जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरी चालक आणि क्लिनरने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे उपस्थित ऑटोचालकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा

पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार

‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज