शिंदे गटातील नेत्याला 35 लाखांचा चूना; वाचून तुम्हीच डोक्याला हात लावाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | वर्ल्ड कपमधील तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाल्याचं समोर आलं. तसेच तिकीट देतो सांगून अनेक भामट्यांनी वर्ल्ड कपच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले. असाच काहीसा प्रकार शिंदे गटाच्या नेत्यासोबत घडला आहे.

शिंदे गटातील नेत्याची फसवणूक

वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट देतो सांगत शिंदे गटातील नेते विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांची फसवणूक झाली.

या तिकिटासाठी त्यांना तब्बल 35 लाख रूपयांचा गंडा घालण्यात आलेला. सामन्याआधी त्यांना तिकिटे तर नाहीच मिळाली त्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले नाहीत.

सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला हे प्रकरणामध्ये दोषी आढळले, पोलिसांनी यामधील सौरभ निकम मीरारोड या ठिकाणी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी असलेला व्यंकट मंडाला हा फरार आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

अनेक दिवस झाल्यावर आरोपी पैसे परत करत नव्हता, शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सर्व काही प्रकार पोलिसांच्या कानावर घातला आणि तक्रार दाखल केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; एका चुकीमुळे कुटुंब झालं उद्ध्वस्त 

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट! 

‘या’ भागात अवकाळी पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा 

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा