बॉयफ्रेंड दुसऱ्या पोरीसोबत दिसला अन् पुढे नको ते घडलं, धक्कादायक प्रकार समोर

मुंबई | प्रेम (Love) हा सर्वांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आपण एखाद्यावर जिवापाड प्रेम करतो. त्यासाठी काहीही करायला तयार असतो. पण त्याच प्रेमाने विश्वासघात केला तर कोणालाच सहन होत नाही. नंतर याच प्रेमाचं रूपांतर रागात होतं.

काहीजण प्रेमात धोका मिळाल्यावर अत्यंत टोकाचं पाऊल उचलतात. अशातच मुंबईमध्ये एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये किन्नरने एकतर्फी प्रेमातून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतलेल्या किन्नरचं नाव अलवीना खान आहे. मुंबईतील मालवणी येथे ती वास्तव्यास होती. अलवीना हिचं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, मात्र काही दिवसांपूर्वी अलवीनाने त्या मुलाला दुसऱ्या मुलीसोबत मालाडमधील मढ येथे हातात हात फिरत असताना पाहिलं होतं.

अलवीनाने त्यानंतर त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने भेटायला नकार दिला. त्याच्या अशा वागण्याने ती त्रासली होती. कारण अनेकवेळा अलवीनाने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला होता पण तो तिला वारंवार नकार द्यायचा.

त्याचा हाच नकार आणि वागणं अलवीनाला सहन झालं नाही. अलवीनाने शेवटी टोकाचा निर्णय घेतला. इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या अलवीनाने व्हिडीओ रेकॉर्ड करत गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

सध्या मालवणी पोलिसांनी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तिने एकतर्फी प्रेमातून हा निर्णय घेतला की यामागे काही वेगळं कारण आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Sex Life | पुरूषांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ 6 गोष्टी बनवू शकतात तुम्हाला नपुंसक 

‘जे रामाचे भक्त असतात ते…’; बागेश्वर महाराजांकडून फडणवीसांचं कौतुक 

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?