पुणे | ड्रग्ज माफिया ललित पाटीलबाबत (Lalit Patil) नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. पुण्याच्या ससून रुगणालयातून फरार झालेल्या ललितला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या ललितची ड्रग्ज प्रकरणात खोलवर जाऊन चौकशी चालू आहे.
ललित पाटीलबद्दल (Lalit Patil) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयात ललित पाटील (Lalit Patil) मुक्काम करत होता. दरम्यान या रुग्णालयातील वॉर्ड नंबर 16 मधील क्लार्क आणि नर्स यांची चौकशी करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांकडून ही चौकशी करण्यात येत आहे. ललित पाटीलचा (Lalit Patil) ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यात हे क्लार्क आणि नर्स प्रयत्नशील होते का?, त्यांनी ललित पाटीलला (Lalit Patil) कोणत्या प्रकारची मदत केली आहे का? याची सध्या चौकशी करण्यात येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ससून रुग्णालयात ललितचा मुक्काम वाढावा यासाठी त्याला ससूनच्या डिनने मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सोबतच ललितच्या मुक्कामासाठी नक्की कोण प्रयत्न करत होते? आणि ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? ही माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे.
त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात ससूनमध्ये काम करणाऱ्या क्लार्क महेंद्र शिवटे याचं नाव सातत्याने समोर येत आहे. शिवटे हे कैद्यांना कुठे आणि किती दिवस ठेवायचं यात सहभागी असतात. त्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
थोडक्यात बातम्या –
बॉयफ्रेंड दुसऱ्या पोरीसोबत दिसला अन् पुढे नको ते घडलं, धक्कादायक प्रकार समोर
Sex Life | पुरूषांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ 6 गोष्टी बनवू शकतात तुम्हाला नपुंसक
‘जे रामाचे भक्त असतात ते…’; बागेश्वर महाराजांकडून फडणवीसांचं कौतुक
‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब
‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा