अदानींसाठी मोठी गुड न्यूज; कंपनीला पुन्हा आले अच्छे दिन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या 6 महिन्यांत अदानी समूहाच्या (Adani Group) नफ्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे याच काळात अदानी समूहाला हिंडेनबर्ग रिसर्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीचाही सामना करावा लागला होता. मात्र आता अदानी समूहासाठी मोठी गुड न्यूज समोर आलीये.

शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स अद्याप त्या पातळीपर्यंत पोहोचले नसतील, परंतु गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत कंपन्यांच्या नफ्यात दुपटीने वाढ झाली आहे. विक्रीत नक्कीच घट झाली आहे. मात्र दुपटीने नफ्यात वाढ झालीये.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, अदानी समूहाच्या 9 सूचीबद्ध कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत त्यांच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 107.7 टक्क्यांनी वाढ केली आहे. दुसरीकडे, निव्वळ विक्रीत 14 टक्के घट झाली आहे.

अदानी समूहाच्या 9 सूचीबद्ध कंपन्यांच्या नफ्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत 107 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि तो 23,929 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपन्यांच्या निव्वळ विक्रीत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जे 14 टक्क्यांनी कमी होऊन 1.49 ट्रिलियन रुपयांवर आले आहे. या कालावधीत शेअर बाजारात सूचिबद्ध इतर कंपन्यांच्या विक्रीत 8.1 टक्के वाढ झाली आहे. जर आपण निव्वळ नफ्याबद्दल बोललो तर त्यात 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

हिंडेनबर्ग संशोधन अहवाल जानेवारीत आला. या अहवालात अदानी समूहावर अकाउंटिंग फ्रॉड आणि शेअर्समध्ये फेरफार असे आरोप करण्यात आले होते. जे गौतम अदानी यांनी स्वीकारण्यास नकार दिला होता.

अहवालानुसार, या काळात अदानी समूहाच्या कर्जातही वाढ झाली आहे. अहवालानुसार, समूहाच्या 9 कंपन्यांचे कर्ज पहिल्या सहामाहीत 7.7 टक्क्यांनी वाढून 2.39 ट्रिलियन रुपये झाले आहे.

मीडिया रिपोर्टमधीनूसार, पहिल्या सहामाहीत कंपन्यांकडे रोख रक्कम 43,160 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ते 33,200 कोटी रुपये होते.

महत्त्वाच्या बातम्या-