“…तर गिरीश महाजनांना भर चौकात जोड्याने मारेन”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आता पुन्हा दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) हृदयविकाराचा त्रास झाला होता. यावरून गिरीश महाजनांनी खडसेंनी नाटक केल्याचं म्हटलं होतं. याला खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली. मला वाटतं त्यांचं वय साठ वर्षांचं होत आलंय त्यामुळे साठी आणि बुद्धी नाठी असं होतंय. त्यामुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी स्त्रीरोगांकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे त्यांचं हृदयरोगांकडे कमी लक्ष गेलं. त्यांना जर खात्री करायची असेल तर माझी कागदपत्रं तपासावीत त्यात कार्डिअॅटिक अरेस्ट काय असेल तो देखील पाहून घ्यावा, असं खडसे म्हणालेत.

माझं हृदय बंद पडलं होतं. बंद पडलेलं हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टरांना करावे लागले. 70 ते 80 लाख लोकांमधून एखादा अशा अवस्थेतून परत येतो, तसा मी परत आलो. कारण संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते. पण आता गिरीश महाजन यांना हे कसं कळणार?, असा सवाल खडसेंनी केलाय.

माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. जर त्यांना हे सांगता आलं की माझा आजार खोटा आहे, सहानुभूती मिळावी म्हणून मी हे केलं आहे तर गिरीश महाजन यांनी भर चौकात मला जोडे मारावेत. पण माझी कागदपत्रं खरी आहेत हे सिद्ध झालं तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार आहे, असं खडसे म्हणालेत.

नेमकं काय म्हणाले होते गिरीश महाजन?

खडसे यांना गौण खनिज प्रकरणी 137 कोटींची नोटीस आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून ‘एअर ॲम्बुलन्स’ने मुंबई येथील रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले. असा कोणता हृदयविकाराचा झटका त्यांना आला? खोटी सोंगं करायची. उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे. याला काय म्हणावं? त्यापेक्षा श्री. खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असं महाजन म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-