Weather update | सावधान! राज्यातील ‘या’ जिह्यांना यलो अलर्ट जारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ऐन हिवाळ्यात (Winter) नागरिकांना छत्री घेऊन घरा बाहेर पडावं लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) दर्शवला आहे. यंदाच्या मानसूनवेळी (Monsoon) चांगला पाऊस झाला नाही. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नोव्हेंबर (November) म्हटलं की हिवाळा सुरु व्हायची चाहूल लागते. मात्र सध्या तरी राज्यात कुठेही पाहिजे तसा हिवाळा सुरु झालेली नाही. मात्र काही शहरांमध्ये थंडी (Winter) वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी आणि दुपारी उकाडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने कोणता इशारा दिला?

नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मागचं कारण हवामान विभागाने सांगितलं. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील वातावरण (Climate) बिघडलं आहे. येत्या 24 तासांत देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई, (Mumbai) ठाणे (Thane), पालघरसाठी (Palghar) यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच बरोबर महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागात विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या कुठल्या भागात विजांचा कडकडाट होणार?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह (ताशी 30 ते 40 किमी) पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. शक्यता आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या (SAFAR) आकडेवारीनुसार, पूर्वेकडील वारे पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे तामिळनाडू (TamilNadu) किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ (Keral) आणि आसपासच्या भागात पोहोचेल.

दरम्यान राज्यात पावसाचा इशारा असल्याने कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangali) जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातही त्याचा परिणाम हवामानावर झाल्याचे पाहायला मिळेल. तर तमिळनाडूच्या आणि केरळमध्ये समुद्र सपाटीपासून 3.1 चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील 48 तासांत राज्यासह देशातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होईल.

थोडक्यात बातम्या-

Pune | पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!