मुंबई | राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु झालं आहे. परंतु मागासवर्गीय आयोग केवळ मराठाच नाही तर सर्व जातींचे सर्वेक्षण करणार असल्याची बातमी आली होती. आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.
बैठकीत सर्व जातीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु यासंदर्भात बैठकीत फक्त चर्चा झाली. निर्णय झालेला नाही. बैठकीत चर्चा होणे आणि निर्णय होणे यामध्ये फरक आहे. केवळ फक्त मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाल्याचं आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी सांगितलं आहे.
राज्य मागासवर्ग आयोग फक्त मराठा समाजाच सर्वेक्षण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. आयोगाचं काम सुरु असताना मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरावर कुणबी नोंदणी तपासण्याचे कामही सुरु आहे. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. तसेच इतर समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी ठराव करणे गरजेच आहे. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाने तसा कोणताही ठराव केलेला नाही. यामुळे फक्त मराठा समाजाचे मागासलेपण तपासाले जाणार असल्याचं आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी स्पष्ट केलं आहे.
बैठकीत सगळ्या समाज घटकाचे सर्वेक्षण करावं, अशी मागणी काही सदस्यांनी केली. मात्र तसा निर्णय झालेला नाही, असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी प्रक्रिया वेगाने सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर विविध पातळयांवर काम सुरु झाले आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु झालं आहे.
संविधानातील तरतुदीनुसार सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण 20 निकषांवर तपासले जाणार आहे. येत्या दोन, तीन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. या अहवालानुसार राज्यातील सामाजिक आरक्षण ठरण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धनंजय मुंडे माझ्या कानात म्हणाले की…’; जरांगे पाटलांकडून मोठा खुलासा
अदानींसाठी मोठी गुड न्यूज; कंपनीला पुन्हा आले अच्छे दिन