Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सोन्या-चांदीच्या दरात(Gold Rate,Silver Rate) सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच सणासुदीच्या तोंडावर अनेकजण सोने-चांदी खरेदी करण्यास पसंती देत असतात. आता सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सोन्या-चांदीचे आजचे दर.

सोने गेल्या 10 दिवसांत 1500 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 20 नोव्हेंबरला सोने 50 रुपयांनी स्वस्त झाले. 21 नोव्हेंबरला 380 रुपयांची झेप घेतली. 22 नोव्हेंबर रोजी भावा स्थिर होता. 23 नोव्हेंबर रोजी किंमती 50 रुपयांनी उतरल्या. गुड रिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,437 रुपये, 23 कॅरेट 61,191 रुपये, 22 कॅरेट सोने 56,276 रुपये झाले. 18 कॅरेट 46,078 रुपये, 14 कॅरेट सोने 35,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,046 रुपये झाला.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

दोन आठवड्यात गुंतवणूकदारांची चांदी झाली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 4600 रुपयांची उसळी घेतली. 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,200 रुपये आहे.

20,22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक असा समजून घ्या 

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटच्या सोन्याच्या दागिण्यांवर 999, 23 कॅरेटच्या दागिण्यांवर 958 आणि 22 कॅरेट 916. तसेच 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेलं असतं.

महत्त्वाच्या बातम्या-