मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांची सर्वात मोठी मागणी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

हिंगोली | दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतच चालला आहे. अशात ओबीसी समाजाने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वात मोठी मागणी केली आहे. मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शिंदे समिती निर्माण केली आहे. ही समितीच रद्द करा, अशी जोरदार मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

शिंदे समिती बरखास्त करा

छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार परिषदेतून जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी काही गोष्टींची मागणी केली. जे सारथीला मिळालं ते ओबीसींच्या महाज्योती आणि सर्वांना द्या. मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शिंदे समिती निर्माण केली आहे. उच्च न्यायालयाने सांगितलं मराठा समाज मागास नाही. मग ही शिंदे समिती कशासाठी?, असा सवाल छगन भुजबळांनी केलाय.

हिंगोली येथील एल्गर सभेतून ओबीसी नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकावर हल्ला केला. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनाही घेरलं. ज्यात सर्वत्र लावलेले गावबंदीचे बोर्ड काढा. पोलिसांनी राज्यघटनेप्रमाणे कारवाई करावी, असं भुजबळ म्हणालेत.

शिंदे समितीच बरखास्त रद्द करा. त्यांना कुणालाही मागास ठरवण्याचा अधिकार नाही. दोन महिन्यात देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्टे द्या. हे चालणार नाही, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.  समिती बरखास्त करा, तसेच दोन महिन्यात जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, ते रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

“दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या”

दरम्यान, राहुल गांधी जातीय जनगणनेची मागणी करत आहे. इतर पक्षातूनही ही मागणी पुढे येत आहे. मग एकादाची जातीय जनगणना करा आणि ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मग समजणार कोण मागास आहे. बिहार करु शकतो तर महाराष्ट्र का करु शकत नाही. जनगणनेत जे येईल, ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, असं भुजबळ यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकारी, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल! 

थंडीत Heart Attack चा सर्वाधिक धोका; ‘या’ चूका करू नका 

Manoj Jarange | ‘या’ बड्या नेत्याचा सल्ला मनोज जरांगेंना मान्य!

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर