‘पेटवायला अक्कल लागत नाही’; छगन भुजबळ जरांगेंवर भडकले

मुंबई | हिंगोलीत आज ओबीसी समाजाची एल्गार परिषद सुरू आहे. या परिषदेतून मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी जोरदार टोलेबाजी करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर हल्ला चढवला आहे. दोन्ही बाजूने आम्हाला अडचणीत आणत आहेत. एका बाजूला कुणबी सर्टिफिकेट घ्या आणि आरक्षण द्या म्हणत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आहेत. तुमचं आमचं आरक्षण चुकीचं आहे. ओबीसींना बाहेर काढा असं त्यांचं म्हणणं आहे. हायकोर्टात केस सुरू आहे. काय करायचं? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

पेटवायला अक्कल लागत नाही

ओबीसी आरक्षणाचा इतिहास सांगतानाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. अरे पेटवायला अक्कल लागत नाही. पटवायला अक्कल लागते, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. भुजबळांनी यावेळी सरकारवर देखील टीका केली.

छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार परिषदेतून जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी काही गोष्टींची मागणी केली. जे सारथीला मिळालं ते ओबीसींच्या महाज्योती आणि सर्वांना द्या. मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शिंदे समिती निर्माण केली आहे. उच्च न्यायालयाने सांगितलं मराठा समाज मागास नाही. मग ही शिंदे समिती कशासाठी?, असा सवाल छगन भुजबळांनी केलाय.

शिंदे समितीच बरखास्त रद्द करा. त्यांना कुणालाही मागास ठरवण्याचा अधिकार नाही. दोन महिन्यात देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्टे द्या. हे चालणार नाही, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. समिती बरखास्त करा, तसेच दोन महिन्यात जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, ते रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

“हमारे हक्क पर जहाँ आच आये”

अधिकार की लडाई में निमंत्रण नही भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है, वह खुद समर्थन में आ जाते है, याद रखो, हमारे हक्क पर जहाँ आच आये टकराना जरूरी है, तुम जिंदा हो तो जिंदा नजर में आना जरूर है, असा शेर ऐकवत भुजबळांनी जोरदार टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकारी, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल! 

थंडीत Heart Attack चा सर्वाधिक धोका; ‘या’ चूका करू नका 

Manoj Jarange | ‘या’ बड्या नेत्याचा सल्ला मनोज जरांगेंना मान्य!

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका