Maharashtra Rain Update | सावधान! राज्याच्या ‘या’ भागात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) काही ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. ऐन हिवाळ्यात (Winter) नागरिकांना रेनकोट आणि छत्री घेऊन घराबाहेर पडावं लागत आहे. दरम्यान राज्याच्या (State) काही भागात पावसाने कहर केल्याचं पहायला मिळत आहे. नोव्हेंबर (November) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

News Title: maharashtra rain update warning of rain with hail in this part of the state

या पावसाचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होणार आहे. कारण हा पाऊस रब्बी पिकांसाठी (Rabbi Crops) योग्य आहे. त्यामुळे रब्बी पिकांना देखील याचा फायदा होणार आहे. दरम्यान हवामान विभागाने (Department of Meteorology) एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने कोणता इशारा दिला?

राज्यात गारपीट आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) कोसळला. तर आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. यामुळे हिवाळ्यात पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांची (Cyclic Winds) परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे.

राज्यातील परभणी (Parbhani), छत्रपती संभाजीनगर (Chattrapati Sambhajinagar), जळगाव (Jalgaon), नाशिक (Nashik) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने (Orange Alert) दिला आहे. राज्यात सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज देखील पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तर, पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला. तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट झाली आहे. मंचर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार बँटीग झाली. मुंबईमध्ये पावसाचं वातावरण कायम आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे.

यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon) पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पडणाऱ्या पावसाचा शेतकऱ्यांना आणि पिकांना फायदा होणार आहे. मात्र सध्या काही जिल्ह्यात (District) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. यासोबतच हवामान विभागाने मुंबई शहरात सुद्धा पावसाचा इशारा जारी केला आहे.

राज्यासह देशातील वातावरण (Climate) बिघडलं आहे. येत्या 24 तासांमध्ये देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. दरम्यान यंदा सुरु असलेल्या पावसाचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होणार आहे, असं असलं तरी नाशिकमध्ये रब्बी पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

नाशिकमध्ये रब्बी पिकांचं नुकसान

नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय मोठ्या आकाराच्या गारांचा पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यावर अवकाळीचं संकट उभं ठाकल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. दरम्यान आज सोमवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्हाला लग्न झालेल्या महिला आकर्षित करतात?”, चौघांनी सांगितल्या अत्यंत धक्कादायक गोष्टी

लग्नानंतर करा फक्त ‘या’ गोष्टी, नवरा कायम राहील फक्त तुमचाच दिवाना!

‘महिलांना पुरूषांची गरज असते कारण…’; नीना गुप्तांचं वक्तव्य चर्चेत