Hardik Pandya थेट Mumbai Indians च्या ताफ्यात | IPL ची सर्वात मोठी अपडेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | IPL 2024 ही जगातील क्रिकेटसाठीची सर्वात मोठी लीग सध्या जवळ येऊन ठेपली आहे. अशात आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Indian Premier League अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर यासंदर्भात माहिती शेअर करण्यात आली आहे. (Mumbai Indians traded for Hardik Pandya)

Gujarat titans release Hardik Pandya-

गुजरात टायटन्स ही आयपीएलमधील गेल्या दोन मोसमांमधील सर्वात यशस्वी टीम्सपैकी एक टीम आहे. पदार्पणाच्या वर्षातच त्यांनी आयपीएलची ट्रॉफी स्वतःच्या नावे केली. त्यानंतरच्या वर्षात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं, मात्र सलग दोन मोसमात त्यांनी केलेल्या कामगिरीच जोरदार कौतुक झालं.

गुजरात टायटन्स एवढी यशस्वी ठरली तरी यंदाच्या मोसमात मात्र गुजरातच्या गोटातून काही चांगल्या बातम्या येत नव्हत्या. दोन मोसम गुजरातचं नेतृत्त्व करणाऱ्या हार्दिक पांड्याबद्दल या बातम्या येत होत्या, ज्यामध्ये हार्दिकला ऑक्शनआधी ट्रेड केलं जाणार असल्याची माहिती होती.

अखेर ही माहिती खरी ठरली आहे. गुजरातच्या संघानं हार्दिक पांड्याला ट्रेड केलं आहे. गुजरातसोबचे हार्दिकचे संबंध आता तुटले असून तो आपल्या जुन्या मुंबई इंडियन्स या संघात दाखल झाला आहे.

Hardik Pandya traded to Mumbai Indians

हार्दिक पांड्या मूळचा मुंबई संघाचा खेळाडू होता. गुजरात टायटन्सचा आयपीएलमध्ये समावेश केल्यानंतर त्याला गुजरातने उचललं आणि थेट कॅप्टन केलं, त्याच्यावर 15 कोटी रुपयांची बोली गुजरातनं लावली होती. आता मुंबई आपल्या कॅमरुन ग्रीन या खेळाडूला ट्रेड केलं, त्यानंतर हार्दिकला पुन्हा आपल्या संघात घेतलं. कॅमरुन लवकरच रॉयल चॅलेजर्सं बेंगळुरु संघात दिसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-