जया किशोरी सांगतात: फक्त ‘या’ गोष्टी करा, आयुष्यात कधीच खाणार नाही धोका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी चांगलं जीवन जगण्यासाठी अनेक चांगले विचार सांगत असतात. या विचारांनी तुम्ही तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकता. जया किशोरी यांनी बोललेल्या शब्दांचा इतका सकारात्मक प्रभाव पडतो की ऐकणाऱ्याचं आयुष्य बदलू शकतं.

जया किशोरीच्या कार्यक्रमांना लाखो लोक हजेरी लावतात आणि सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांची प्रेरणादायी भाषणे खूप व्हायरल होतात. जया किशोरी कौटुंबिक ते करिअरपर्यंतच्या गुंतागुंतीच्या विषयांवर आपली मते मांडतात. आज आपण त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही आयुष्यात कधीच धोका खाणार नाहीत.

डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका

जया किशोरी म्हणतात की कोणत्याही धोक्याला खूप मनाला लावून घेऊ नका. पण त्या धोक्यातून आपण काय शिकलो ती गोष्ट फक्त विसरू नका. आणि ती चूक पुन्हा पुन्हा करू नका.

स्वीकार करा

लोकांवर विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे धोक्यापासून वाचण्यासाठी त्याला स्वीकार करण्याची क्षमता ठेवा. आपण जेव्हा स्वीकार करतो तेव्हा आपल्याला त्रास होणं बंद होईल.

अपयशानंतर थांबू नका 

जया किशोरी यांनी एकदा सांगितलं की यशस्वी व्यक्ती कोण आहे. त्यांच्या मते यशस्वी व्यक्ती तो नसतो ज्याने कधीही अपयश पाहिलं नाही. यशस्वी तोच होतो जो पडल्यावर उठतो आणि थांबत नाही. पडण्याचा अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातो. तसेच जया किशोरी सांगतात की तुम्ही वेळेचा आदर करा वेळ तुमचा करेल. आयुष्यातील प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन जन्म असतो. त्यामुळे दिवसाची सुरूवात उस्ताहाने आनंदाने करा.

महत्त्वाच्या बातम्या-