शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ‘त्या’ दोन आमदारांची सुटका?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता (Disqualification of MLA) प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिलेला आहे. त्यामुळे नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी पार पडावी यादृष्टीने प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसातही सुनावणी सुरु राहणार आहे. अशात आता शिंदे गोटातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ठाकरे गटाकडून याचिका दाखल

काही दिवसांआधी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्धव ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

विधानपरिषदेतील शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांचा आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यात संपणार आहे. तसेच अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याने त्यांची अपात्रतेच्या धोक्यापासून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

ठाकरे गटाला तिघांविरोधातील याचिकेवर सुनावणी हवी आहे. पण सध्या ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे. विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता आहे. तसंच नवीन सभापतींची निवड झाल्यावरच ती होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता असून सभापतींची निवड झाल्यावरच ती होण्याची चिन्हे आहेत. मनीषा कायंदे यांचा आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2024 ला संपतोय. तर विप्लव बजोरिया यांचा आमदारकीचा कार्यकाळ 21 जून 2024 रोजी संपत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Samsung Galaxy | 50MP Camera, 5000mAh बॅटरी, किंमत 10 हजारांपेक्षा कमी, या फोनची बाजारात क्रेझ

Hasin Jahan च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री; स्वतः दिली कबुली

IPL 2024 | Gujrat Titansचे धक्क्यावर धक्के, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू नवा कॅप्टन

IPL 2024 | गुजरात-मुंबईमध्ये Hardik Pandyaचा लफडा, खरी लॉटरी लागली विराटच्या RCBला!

Rain Update: धक्कादायक माहिती; अवकाळी पावसामुळे 20 जणांचा मृत्यू