अहमदाबाद | IPL 2024 साठी सर्वात मोठी बातमी म्हणजे Gujrat Titans संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला गुजरातने ट्रेड केलं, मुंबई इंडियन्सने पांड्याला पुन्हा आपल्या संघात घेतलं. यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर शुबमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीये.
Shubman Gill appointed as captain of Gujarat Titans
मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पंड्या गेल्याने गुजरात संघाने आपला नवीन कर्णधार म्हणून शुबमन गिल याची नियुक्ती केली आहे. शुबमन गिल याने गुजरातसाठी दमदार कमगिरी केली असून यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा ऑरेंज कॅप जिंकली होती. शुबमन याने 17 सामन्यांमध्ये 890 धावा केल्या होत्या.
शुभमन गिल आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याने ऑरेंज कॅप जिंकली होती. गिलने 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या. केन विल्यमसनही गुजरात टायटन्सचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत होता, पण भविष्य डोळ्यासमोर ठेवून फ्रँचायझीने या युवा भारतीय खेळाडूला महत्त्व दिलं आहे.
24 वर्षीय शुभमन गिलने 2018 साली कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) आयपीएलमध्ये पदार्पण केले. गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 37.70 च्या सरासरीने 2790 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली.
शुबमनची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 129 आहे. शुभमन गिलने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 273 चौकार आणि 80 षटकार मारले आहेत. आयपीएल 2023 च्या लिलावापूर्वी, गिलला गुजरात टायटन्सने 8 कोटी रुपयांना करारबद्ध केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-