Kannad Accident | क्षणात होत्याचं नव्हतं झालं; देवदर्शनाहून परतताना भयानक अपघात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या कन्नड घाटात रविवारी रात्री अपघात (Kannad Accident) झाला. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली.

या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात सात जण जखमी झाले आहे. दोन्ही अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घाटात झालेला हा अपघात अत्यंत भीषण होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं आहेत.

रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावरही कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात रविवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले.

सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर अक्कलकोट येथून दर्शन घेऊन येणाऱ्या तवेरा गाडीचा रविवारी रात्री दोन वाजता अपघात झाला. हे सर्व जण मालेगावकडे प्रवास करत होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

लग्नानंतर करा फक्त ‘या’ गोष्टी, नवरा कायम राहील फक्त तुमचाच दिवाना!