Asim sarode | ‘अत्यंत फालतू माणूस’; असीम सरोदेंची भगतसिंह कोश्यारींवर टीका

मुंबई | जनता न्यायालय पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे वरील अॅड. असीम सरोदे (Asim sarode) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना सरोदेंनी तत्कालीन राज्यपांलाचा फालतू माणूस असा उल्लेख केला. असीम सरोदेंनी (Asim sarode) भगसतिंह कोश्यांरींना फालतू माणूस म्हटलंय.

दोन तृतियांश लोक बाहेर गेले तर त्यांनी गट स्थापन केला किंवा विलिनीकरण केलं तर संरक्षण मिळतं. शिंदे यांच्यासोबत गेलेले लोक दोन तृतियांश संख्येने गेले नाहीत. आधी 16 लोक गेले. नंतर काही लोकांना अमिष दाखवलं. काहींना बोलावून घेतलं. अशा प्रकारे 38 ते 40  झाले. दोन तृतियांश बहुसंख्येने ते बाहेर पडलं नाही त्यामुळे ते अपात्र आहे, असं वकील असीम सरोदे (Asim sarode) म्हणाले.

जर कुणाला राजकीय पक्ष सोडायचा असेल तर ते पक्ष सोडू शकतात, पण त्या आधारे ते अपात्र ठरतात. राजकीय पक्षाने नेमलेल्या व्हिपचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, त्याचं जर पालन कुणी केलं नाही तर ते आमदार, खासदार अपात्र ठरू शकतो. कायद्यामध्ये विधीमंडळा पक्षाला महत्व नाही, कारण तो पाच वर्षांसाठी असतो. त्यामुळे राजकीय पक्ष हा महत्त्वाचा असतो, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Adult Movies | ‘हे’ चित्रपट फॅमिलीसोबत चुकून पण पाहू नका!

Adah Sharma | अदा शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Acharya Chanakya | यशस्वी व्हायचं असेल तर ‘अशा’ लोकांपासून लांबच राहा!

Life Insurance l लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा…

Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!