Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Atal Setu l 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल बिहारी वाजपेयी सेवारी-न्हावा शेवा अटल सेतू) या भारतातील सर्वात (Atal Setu) लांब सागरी सेतूचे भव्यदिव्य उद्घाटन केले आहे. यावेळी या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील उपस्थितीत होते. या पुलामुळे मुंबईतील शिवडी ते रायगड जिल्ह्यातील (Atal Setu) न्हावा शेवा परिसरादरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु अजूनही या सागरी सेतूचे वैशिष्ट्ये (Atal Setu) नेमके काय आहे हे अनेकांना माहिती नाही.. चला तर मग आज जाणून घेऊयात या रस्त्याचे महत्व व वैशिष्ट्ये :

Atal Setu l अटल सेतू या पुलाचे काही महत्वाचे वैशिष्ट्ये :

– MTHL पुलाला अटल बिहारी वाजपेयी सेवारी-न्हावा शेवा म्हणजे अटल सेतू असेही म्हंटले जाते.

– या पुलाची किंमत साधारण 17,840 कोटी रुपये इतकी आहे.

– हा पूल साधारण 22 किमी लांबीचा सहा लेन असलेला पूल असणार आहे. यातील 16.5 किमी पूल हा समुद्रावर आहे आणि उर्वरित जमिनीवर बांधण्यात आला आहे.

– राष्ट्रीय महामार्ग 4B वरील शिवडी, शिवाजी नगर, जस्सी आणि चिर्ले येथे इंटरचेंज बांधला गेला आहे.

– हा राष्ट्रीय महामार्ग 4B हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडला जाईल.

– या मार्गावरून प्रवास करताना टोलची किंमत कारसाठी प्रति ट्रिप 250 रुपये असेल आणि राउंड ट्रिप रुपये 375 असेल.

– प्रथम, ओपन रोड टोलिंग प्रणाली लागू करणे आहे. महत्वाचे म्हणजे हा अटल सेतू भूकंप प्रतिरोधक असणार आहे.

Atal Setu l अटल सेतू या पुलाबाबतची ही माहिती तुम्हाला माहित आहे का?

– या मार्गासाठी साधारण 84 हजार टन वजनाचे 70 डेक या सेतूमध्ये वापरण्यात आले आहे.
– एवढेच नव्हे तर सागरी सेतूसाठी ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
– यामध्ये महत्वाचे म्हणजे पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीच्या केबलचा वापर करण्यात आला आहे.

– हा पूल भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू मार्ग (Atal Setu) आहे.
– तर लांबीच्या निकषानुसार जगात या पुलाचा दहावा नंबर लागतो.

महत्त्वाच्या बातम्या –

Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु

Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा

Cricket News: सचिन तेंडुलकर-युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!

Crossed Check l बँकेच्या चेकवर दोन रेषा का मारल्या जातात? जाणून घ्या RBI चा नियम काय सांगतो