Business Ideas l तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हे 5 व्यवसाय; आठवड्याला कमवाल हजारो रुपये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Business Ideas l भारतातील प्रत्येकाचच स्वप्न असते ते म्हणजे आपला एक छोटा का होईना व्यवसाय असावा. तर अनेकांचे मनात हे देखील असते की आपण दुसऱ्यांसाठी नोकरी केल्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असलेला केव्हाही चांगला नाही का? आजच्या स्पर्धात्मक (Business Ideas) काळात इंटरनेटमुळे सर्वांकडेच आपल्याला आपल्या स्वप्नातील व्यवसायिक कल्पना असतात, पण त्या सत्यात उतरवण्यासाठी अनेक वेळा त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नसते त्यामुळे कदाचित बर्‍याच जणांचे हे स्वप्नं अधुरेच राहते.

Business Ideas l दहा हजारांच्या आतमध्ये कोणता व्यवसाय करू शकतो?

सध्याचा घडीला भारतातील अनेक तरुण कमीत कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा सुरू करावा यामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा (Business Ideas) चेहरामोहरा बदलण्यासाठी याच तरुण पिढीकडे इच्छाशक्ती व व्यवसायिक दृष्टीकोन आहे. परंतु काही अडचणींमुळे ते व्यवसाय करू शकत नाहीत किंवा कोणता व्यवसाय करावा याचे योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळेच आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की कमीत कमी 10 हजार रुपयांमध्ये आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो?

मेणबत्ती बनवणे (Candle Making) :

साधारण 5,000 ते 6000 रुपयांमध्ये तुम्ही मेणबत्त्या बनवण्यासाठी लागणारी उपकरणे घेऊ शकता. जर तुम्ही घरबसल्या व्यवसाय करण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो..

टिफिन सर्व्हिस (Tiffin service) :

तुम्हाला कमी गुंतवणुकीत जर जास्त नफा मिळवायचा असेल तर 10 हजार रुपयांपेक्षाही कमी गुंतवणुकीत तुम्ही नक्कीच टिफिन सर्व्हिस सुरू करता येऊ शकतो. खासकरून महिलांसाठी हा पर्याय खूप फायदेशीर ठरू शकतो. आपल्याकडे अशी अनेक ठिकाण आहेत जिथे नोकरी किंवा शिक्षणासाठी (Business Ideas) अनेक जण रूमवर कुटुंबापासून एकटेच दूर राहतात. अश्यावेळी त्यांना दररोज हॉटेलचं खाणं किंवा बाहेरचे खाणे परवडत नाही किंवा त्यांचा तब्येतीला मानवत नाही. त्यामुळे घरचं अन्न असलेला टिफिन त्यांना हवा असतो. त्यामुळे आपल्या परिसराचा अभ्यास करून टिफिन सर्व्हिस नक्कीच सुरू करता येऊ शकते.

यू-ट्यूब चॅनेल (YouTube Channel) :

कुकिंग, गेमिंग, तंत्रज्ञान, क्लासेस या विषयांत तुम्हाला आवड असेल आणि सखोल माहिती असल्यास तुम्ही त्याबाबत व्हिडिओ तयार करून ते स्वतःच्या यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड करू शकता. एवढेच नाही तर त्यासाठी लागणारा खर्च साधारण तुम्हाला साधारण दहा हजारांच्या जवळपास असेल व याच 10 हजार रुपयांपेक्षाही कमी खर्चात तुम्ही तुमच्या घरात स्टुडिओसारखं वातावरण तयार करू शकता. व त्याठिकाणहुन बेसिक लाइट्स, फोन ट्रायपॉड अशा गरजेच्या अ‍ॅक्सेसरीज चा वापर करून तुम्ही ते व्हिडिओ Youtube वर पोस्ट करू शकता व youtube च्या साह्याने तुम्ही पैसे कमाऊ शकता.

मेहंदी काढणे (Mehndi Maker) :

आपल्याला माहिती आहे की, लग्नसोहळ्यात नवऱ्या मुलीसह तिच्या कुटुंबातल्या बऱ्यापैकी सर्व महिला,तसेच मैत्रिणीदेखील मेहंदी काढून घेतात. तर लग्न सराईच्या काळात मेहंदी काढून देणाऱ्या महिलांना खूप मागणी असते. तर इतरवेळी देखील मेहंदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अगदी कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

Business Ideas l चहाचा स्टॉल :

आजच्या काळात आपल्याला माहिती आहे की भारतात चहा मोठ्या प्रमाणावर प्यायला जातो. तर भारतात चहा आवडणाऱ्यांची आणि पिणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. याठिकाणी ग्राहक देखील भरपूर असतात. त्यामुळे 10 हजार रुपयांपेक्षा कमी भांडवलात हा चहा बनवण्याचा व्यवसाय करणं शक्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल

Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु

Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा

Cricket News: सचिन तेंडुलकर-युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!